जळगाव : शिवलिंग आणण्यासाठी मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे जाणार्या शिवभक्तांच्या मोटारीला शुक्रवारी पहाटे वाळूने भरलेल्या मालमोटारीची जळगावच्या धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावानजीक जोरदार धडक बसली. या अपघातात जळगावमधील तीन शिवभक्तांचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खोटेनगर परिसरात असलेल्या साईनगरमध्ये महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंदिरात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्याचे नियोजन असल्याने शुक्रवारी पहाटे परिसरातील सात शिवभक्त मोटारीने मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे जाण्यासाठी निघाले.
हेही वाचा…धुळे जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्याची ५८ लाखास फसवणूक
जळगाव शहर सोडल्यानंतर अवघ्या पाच-सहा किलोमीटरवरील बांभोरी गावानजीक केबीएक्स कंपनीकडे जाणार्या रस्त्यावरील चौकात वाळू भरलेल्या भरधाव मालमोटारीची शिवभक्तांच्या मोटारीला जोरदार धडक बसली. पहाटे घडलेल्या अपघाताची माहिती मिळताच बांभोरीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पाळधी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचार्यांनीही धाव घेतली.
अपघातात तुषार जाधव (२५, खोटेनगर, जळगाव), विजय चौधरी (४२, साईनगर, जळगाव), भूषण खंबायत (४५, साईनगर, जळगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात दिलीप साळुंखे, के. डी. पाटील, अनिल ठाकरे, बापू पाटील हे चौघ जखमी झाले असून, त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा…राहुल यांच्या भेटीने गांधी कुटुंब-मालेगाव ऋणानुबंधास उजाळा
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी पोलिसांना क्रेन मागवावी लागली. पार्थिव जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. रुग्णालयात मृतांच्या कुटुंबियांसह नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.