नाशिक : शनिवारी मध्यरात्री नाशिक -गिरणारे रस्त्यावरील पुलावरुन गोदावरी नदीपात्रात वाहन कोसळून एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंगापूरपुढे हॉटेल गंमत जंमत ओलांडल्यानंतर गोदावरी नदीवर पूल आहे. शनिवारी मध्यरात्री या पुलाचे कथडे तोडत चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळले. या अपघातात नितीन कापडणीस यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा…नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन लाचखोरांवर कारवाई, एक लाखाची लाच स्वीकारताना महावितरणचा अभियंता जाळ्यात

किरण कदम, योगेश पानसरे (रा. नाशिक) हे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात याविषयी माहिती दिली. वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fatal accident in nashik vehicle plunges into godavari river near gangapur village one dead two injured psg
Show comments