नाशिकच्या लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरण परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींना गजाआड केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ३० वर्षीय आरोपीसह मृताच्या वडिलांना अटक केली. तर अन्य एका अल्पवयीन तरुणाला बालसुधारगृहात पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कळवणचे पोलीस अधिकारी संजय बांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर उर्फ टिल्लू दगू उशीर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर दगू जयराम उशीर आणि संदीप छगन गायकवाड असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपी दगू उशीर यानेच सुपारी देऊन मुलाची हत्या घडवून आणली आहे. सतत दारू पिऊन पैशांची मागणी करतो, शिवीगाळ आणि धमकी देतो म्हणून बापानेच मुलाची सुपारी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी खडकजांब येथील संदीप छगन गायकवाड आणि त्याचा सोळा वर्षीय साथीदाराला अटक केली. दोघांकडे सखोल तपास केला असता खून झालेल्या युवकाचे वडील दगू जयराम उशीर यानेच मुलास मारण्यासाठी १८ हजार रुपयांची सुपारी दिल्याचं तपासात निष्पन्न झालं. मुलगा दारू पिऊन सतत पैसे मागतो. या छळाला कंटाळून आरोपी वडिलांनी ही सुपारी दिली.

पोलिसांनी आरोपी वडील आणि खून करणारा संशयित आरोपी संदीपला अटक केली आहे. तर आरोपी अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father killed son by giving money to killer crime in nashik accused arrested rno news rmm