नाशिक : देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटर परिसरात शुक्रवारी मादी जातीचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. आर्टिलरी सेंटर येथे असलेल्या मनोहर गार्डनमागे शब्बीर सय्यद यांचा मळा आहे. मंगळवारी सायंकाळी सय्यद यांच्या कुटूंबातील महिला तीन वर्षाच्या मुलाला घराबाहेर नैसर्गिक विधीसाठी घेऊन गेल्या. महिला बालकाजवळ असताना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. बिबट्याचा आवाज ओळखून महिलेने मुलाला उचलत आरडाओरड केल्याने बिबट्या निघून गेला.

हेही वाचा : जळगाव : दुचाकी चोरांचा सूत्रधार ताब्यात; जळगावात आठ दुचाकी हस्तगत

जाताना त्याच परिसरात एका बंगल्याबाहेर असलेल्या कुत्र्याचा त्याने फडशा पाडला. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आल्यावर परिसरात पिंजरा लावण्यात आला. या पिंजऱ्यात शुक्रवारी सकाळी बिबट्या अडकला. वनविभागाला याविषयी माहिती देण्यात आली. वनअधिकारी पिंजऱ्याच्या दिशेने जात असताना पिंजऱ्याभोवती नर बिबट्या घिरट्या घालत असल्याचे दिसले. वनअधिकाऱ्यांनी शिताफीने वन अधिकारी उत्तम पाटील यांच्या मदतीने पिंजरा सुरक्षितस्थळी हलविला.

Story img Loader