नाशिक – येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या वसाहतीत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पोलीस अकादमी मध्ये स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीतील कर्मचाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यावर हा अत्याचार झाला. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> लोकसभेत प्रचार केला, आता विधानसभेच्या जागा द्या, घटक पक्षांचे मविआवर दबावतंत्र

संशयित सुमित राजुरे (२३, रा. नाशिक) हा पोलीस प्रबोधिनीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीचा कर्मचारी आहे. पीडिता आणि सुमितचे प्रेमसंबंध होते. पीडितेने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने सुमितने रात्री बेदम मारहाण केली. त्यानंतर बलात्कार केला. हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या रहिवासी वसाहतीत घडला. सुमितने रात्रभर पीडितेला मारहाण केली. या घटनेत तक्रार देणारी महिला कर्मचारी खासगी रुग्णालयात दाखल आहे. बलात्कार आणि मारहाणीनंतर सुमितने पीडितेचे चित्रणही केल्याचे सांगितले जाते. पीडितेच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमित यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.