नाशिक : जिल्ह्यातील चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ देवळा नगरपंचायतीच्या १५ नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भावासाठी उमेदवारी करणार नसल्याचे जाहीर करणारे आमदार डॉ. राहुल आहेर यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर दोन्ही भावांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, त्यातून समाधान न झाल्याने केदा आहेर समर्थक संतप्त आहेत. कार्यकर्त्यांची भावना जाणून दोन दिवसांत केदा आहेर हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

भाजपने राज्यातील पहिल्या उमेदवारी यादीत चांदवड-देवळा मतदारसंघात आमदार डॉ. आहेर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उमेदवारी जाहीर होण्याआधी आमदार आहेर आणि केदा आहेर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. उमेदवारीतून माघार घेत डॉ आहेर यांनी यावेळी पक्षाने भावाला तिकीट देण्याची शिफारस पक्षाकडे केली होती. परंतु, दिल्लीतून जाहीर झालेल्या यादीत आमदारांचे नाव झळकल्याने केदा आहेर समर्थकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. डाॅ. राहुल आणि केदा या दोन्ही आहेर बंंधुंनी सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, पेच सुटला नाही. यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही बंधुंच्या समर्थकांमध्ये दोन गट पडले आहेत. निवडणुकीत अनुकूल वातावरण असताना पक्षाने केदा आहेर यांना डावलल्याचा आरोप करीत देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, गटनेते संजय आहेर यांच्यासह भाजपच्या एकूण १५ सदस्यांनी राजीनामे पक्षाकडे सादर केले. यामुळे नगरपंचायतीवरील सत्ता भाजपने गमावली आहे.? भाजप उपजिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांनीही राजीनामा दिला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…कळवणमध्ये अजित पवार गट, माकपमध्ये सामना

केदा आहेर समर्थकांनी मंगळवारी सायंकाळी चांदवड येथील मातोश्री लॉन्स येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. परंतु, केदा आहेर मेळाव्यास उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जाते. समर्थकांच्या भावना जाणून दोन दिवसांत ते पुढील भूमिका निश्चित करणार आहेत. या संदर्भात भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही ते उपलब्ध झाले नाहीत. भाजपकडून निर्णय बदलला जाण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे केदा आहेर बंडखोरी करण्याच्या विचारात आहेत. स्थानिक पातळीवर पक्षात फूट पडली असून कौटुंबिक कलह कमी होण्याऐवजी वाढण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader