नाशिक : राजकीय डावपेचांमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी विभागातील ३३८ मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होणार आहे. महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या शुभांगी पाटील आणि भाजपकडून मिळणाऱ्या छुप्या पाठिंब्यावर सत्यजित तांबे यांच्यात मुख्य लढत होण्याची चिन्हे असली तरी रिंगणात एकूण १६ उमेदवार आहेत. यात वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे आणि स्वराज्य संघटनेने पाठिंबा दिलेले सुरेश पवार यांचाही समावेश आहे. भाजपने तांबे यांना मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत अधिकृत पाठिंबा देण्याचे टाळले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या निवडणुकीचे वैशिष्ठय़ म्हणजे रिंगणात प्रथमच एकाही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार नाही. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार वगळता जवळपास सर्वच उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आहेत. काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी अर्ज न भरून काँग्रेसची कोंडी केली. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली. त्यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी भाजपकडून अधिकृतपणे तसे जाहीर केले गेले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना ऐनवेळी पाठिंबा देऊन आपला उमेदवार बनवले. राजकीय खेळींमुळे वातावरण ढवळून निघाले.
या एकंदर स्थितीत सोमवारी मतदान होणार आहे. मतदार संघात एकूण दोन लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत. यात सर्वाधिक एक लाख १५ हजार ६३८ मतदार हे नगर जिल्ह्यातील तर नाशिकमध्ये ६९ हजार ६५२, जळगाव ३५ हजार ५८, धुळे २३ हजार ४१२ आणि नंदुरबार जिल्ह्यातील १८ हजार ९७१ मतदारांचा समावेश आहे. मतदारांना आपापल्या जिल्ह्यात जवळच्या केंद्रावर मतदान करता येईल यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात १४७, नाशिक ९९, जळगाव ४०, धुळे २९ व नंदुरबार जिल्ह्यात २३ केंद्रांवर मतदान होईल. मतदानाची संपूर्ण तयारी यंत्रणेने पूर्णत्वास नेली आहे. मतदानासाठी आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, शासकीय व खासगी उद्योगातील ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र आदी १० कागदपत्रे मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
केंद्र शोधण्याची ऑनलाईन व्यवस्था
निवडणुकीत मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना कोणत्या मतदान केंद्रात आपले नाव आहे, याची माहिती शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने सीईओइलेक्शन डॉट महाराष्ट्रा डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश जीटीसर्च स्लॅश या लिंकची सुविधा उपलब्ध केली आहे. या लिंकच्या आधारे मतदारांना त्यांना मतदान कोणत्या केंद्रावर करता येईल हे समजणार आहे.
नागपूर विभागात चुरशीची लढत ; २२ उमेदवार रिंगणात
नागपूर : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ३० जानेवारीला सकाळी आठ वाजतापासून १२४ मतदान केंद्रांवर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सहा जिल्ह्यांतील ३९ हजारांवर शिक्षक मतदार त्यांचा विधान परिषदेतील प्रतिनिधी या माध्यमातून निवडणार आहे.
पसंतीक्रमानुसार होणाऱ्या या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात असले तरी माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, शिक्षक परिषदेचे नागो गाणार व शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यातच चुरशीची लढत आहे. २ फेब्रुवारीला अजनीतील सामुदायिक भवन येथे मतमोजणी होणार आहे.
नागपूरसह पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी सहाही जिल्हे मिळून १२४ मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे.