लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : बोनससहथकीत वेतनाची मागणी करत सिटी लिंकच्या वाहकांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे नाशिककर दोन दिवसांपासून वेठीस धरले गेले होते. दरम्यान, महापालिकेने ठेकेदाराला ५६ लाख रुपये दिल्यामुळे त्याने वाहकांना दोन वर्षाचा बोनस दिल्याने गुरूवारी सायंकाळी उशीराने संप मिटला. शुक्रवारी सिटी लिंकची बस सेवा नियमीत सुरू झाली. दरम्यान, संप झाल्यास ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा इशारा महापालिकेने दिला.
आणखी वाचा-पिण्याच्या पाण्याचे नियोजनानंतर सिंचनाचे आर्वतन निश्चित करावे- पालकमंत्री दादा भुसे
बोनससह प्रलंबित वेतनासाठी सिटी लिंकच्या वाहकांनी दोन दिवसांपासून संप पुकारला होता. याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने गुरूवारी सायंकाळी ५६ लाख ठेकेदाराच्या खात्यावर जमा केले. गुरूवारी सायंकाळी हे पैसे जमा झाल्यानंतर पाथर्डी परिसरात सुरू असलेल्या शिव पुराण कथेसाठी २० बस सोडण्यात आल्या. शुक्रवारी शहर परिसरातील सर्व मार्गावर सिटीलिंकच्या २५० बस धावल्या. यामुळे प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, ठेकेदाराची ताठर भूमिका पाहता महापालिकेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत पुढे जर संप केला तर ठेका रद्द केला जाईल असा इशारा दिला.