तीन व्यापाऱ्यांकडून पैसे परत

नाशिक :  जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या १४ व्यापाऱ्यांविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिंडोरी येथील तीन व्यापाऱ्यांनी सात लाख, ५० हजार रुपये परत दिले. तसेच १३ व्यापाऱ्यांनी पुढील १० दिवसांत पैसे परत करण्याचे लेखी दिले आहे. शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी के ले आहे.

नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी कु ठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला होता. लबाडी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असेही त्यांनी बजावले होते. नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या गुन्ह्य़ांचा आढावा घेत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत के ल्या होत्या. बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

वालावलकर यांनी दिंडोरी, निफाड, सिन्नर आणि नाशिक तालुक्यंतील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रोरी जाणून घेत व्यापाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल के ले.

याअंतर्गत जिल्ह्य़ातील वणी येथे चार, पिंपळगाव येथे दोन, दिंडोरी येथे चार, लासलगाव येथे एक, सिन्नर येथे एक, सटाणा  आणि नाशिक तालुका प्रत्येकी एक याप्रमाणे एकू ण १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मातोरी येथील भाऊसाहेब पिंगळे यांनी मेवालाल गुप्ता या व्यापाऱ्याशी द्राक्ष खरेदीचा व्यवहार के ला होता. मेहताने िंपंगळे यांच्याकडून द्राक्ष खरेदी करून चार दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले. पिंगळे हे त्यानंतर गुप्ताच्या पंचवटी येथील गाळ्यावर पैसे घेण्यासाठी गेले असता गुप्ता पळून गेल्याचे समजले. पिंगळे यांची ३३ लाख, २२ हजार ६१० रुपयांना फसवणूक झाली. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका घटनेत दिंडोरी येथील जयेश मेधने यांनी अमित गुप्ता, सुमित गुप्ता, दीनानाथ गुप्ता यांच्याशी द्राक्ष

विक्रीचा व्यवहार केला. संशयितांनी मेधने यांच्याकडून द्राक्ष खरेदी के ली. परंतु, मेधने यांच्या खात्यावर द्राक्ष खरेदीचे सात लाख, ७४ हजार ९४५ रुपये जमा के ले नाहीत. मेधने यांनी फसवणूक झाल्याने वणी पोलीस ठाण्यात तक्रोर के ल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप चित्ते यांनी दिंडोरी तालुक्यातील वैभव कावळेसोबत द्राक्ष खरेदीचा व्यवहार के ला. आठ लाख, ५३ हजार ३०० रुपये व्यवहार ठरला. कावळे याने द्राक्ष खरेदी करून खात्यावर पैसे नसतानाही त्या रकमेचा धनादेश देत चित्ते यांची फसवणूक के ली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा असाच अनुभव संतोष कोंड यांना आला. संशयित वैभव कावळेने कोंड यांची चार लाख, २० हजार ३४८ रुपयांना फसवणूक केली. वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader