लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीत डी सेक्टरमधील सिद्धिविनायक चटई कारखान्याला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा प्लास्टिक दाण्यांचा कच्चा माल तसेच विक्रीसाठी तयार चटईचा साठा खाक झाला. आतमध्ये काम करणारे सर्व कामगार प्रसंगावधान राखून लगेच बाहेर पडल्याने दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Massive fire breaks out at scrap warehouses in Mandala area
मंडाळा परिसरात भंगाराच्या गोदामांना भीषण आग, आगीत ६ ते ७ गोदाम जळून खाक
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…
Firing from pistols Kondhwa, pistol Kondhwa ,
कोंढव्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार, पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा
Firing on saraf shop worker in Shahapur
शहापुरातील सरफच्या दुकानातील कामगारावर गोळीबार
Fire Safety Responsibility Kalyan West Vortex Fire
आपल्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आपलीच!
Massive fire breaks out at plywood factory in Naigaon factory materials burn
नायगाव मध्ये प्लायवूड कारखान्याला भीषण आग, कारखान्यातील साहित्य जळून खाक
Fire breaks out at vasai virar Municipal Corporations Pelhar Ward Committee office
पालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीच्या कार्यालयाला आग

जळगाव शहराजवळील औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने आहेत. उमेश चौधरी (रा.सन्मित्र कॉलनी, जळगाव) यांच्या मालकीचा डी सेक्टरमध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाचा चटई कारखाना आणि सूर्यफूल गोदाम आहे. रविवारी रात्र सत्रात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना, सव्वाअकराच्या सुमारास कारखान्यास अचानक आग लागली. आतमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे दाणे आणि चटई असल्याने आग वेगाने पसरली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगावसह भुसावळ, वरणगाव, दीपनगर, चाळीसगाव येथून आठ ते १० अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही पहाटे दोन वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. आग लागली त्यावेळी तिसऱ्या सत्रात काम करणारे १० ते १५ कामगार कारखान्यात कार्यरत होते. प्रथम कारखान्यात नेमके काय झाले, हे कामगारांच्या लक्षात आले नाही. आग लागल्याचे समजताच सर्वजण प्रसंगावधान राखून तत्काळ बाहेर पडले, त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही.

आणखी वाचा-फसवणुकीत द्राक्ष व्यापाऱ्यांना मदत करणारेही गुन्हेगार, पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची तयारी

चटई कारखान्यास आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आल्यावर जळगाव तसेच जिल्ह्यातील भुसावळ, वरणगाव, चाळीसगाव, दीपनगर येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने कारखान्याच्या संरक्षण भिंती तोडून आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितल्यानुसार, दुसऱ्या मजल्यावरील शेडमध्ये असलेल्या जेवणाच्या खोलीत कुलरच्या वायरीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली. आगीच्या या घटनेमुळे चटई कारखान्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, पोलीस व संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार शीतल राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीचे कारण जाणून घेतले. झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Story img Loader