जळगाव: महापालिकेच्या जैववैद्यकीय (बायो वेस्ट) प्रकल्पाला मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत वैद्यकीय कचरा खाक झाला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तीन बंबांद्वारे नऊ फेर्‍यांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, मंगळवारी दुपारपर्यंत आग धुमसतच होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्कजवळील जुना खत कारखाना येथे जळगाव महापालिकेचा मनसाई बायो वेस्ट प्रकल्प आहे. या प्रकल्पाला आग लागल्याची माहिती अभियंता योगेश बोरोले यांचे स्वीय सहायक शुभम पाटील यांनी पहाटे भ्रमणध्वनीवरून दिल्यानंतर अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन बंबांच्या पथकांनी धाव घेत मार्‍याचा मारा केला. तीन बंबांनी नऊ फेऱ्या केल्या. वैद्यकीय कचरा असून त्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.

हेही वाचा… येवल्यातील समस्यांप्रश्नी भाजप पदाधिकाऱ्याकडून छगन भुजबळ लक्ष्य

संपूर्ण प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. वैद्यकीय कचर्‍यात सुया, सलाइन यांसह इतर साहित्य प्लास्टिकचे असल्याने मंगळवारी दुपारपर्यंत आग धुमसत होती. त्यामुळे आणखी दोन बंब पाठवून मारा केला जात आहे. शहरातील विविध रुग्णालयांतून प्रतिदिन सुमारे एक टन जैववैद्यकीय कचरा या प्रकल्पात जमा केला जातो.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broke out at the jalgaon municipal corporations bio waste project around 2 am on tuesday dvr
Show comments