नंदुरबार जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची धुरा असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अग्निशमन यंत्राची (सिलिंडरची) मुदत संपून दोन महिन्याचा कालावधी उलटला असला तरी त्याचे पुनर्भरण झाले नसल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात १० किलो क्षमतेचे २४ सिलिंडर ठिकठिकाणी ठेवण्यात आले आहेत. या सिलिंडरचे दरवर्षी पुनर्भरण करावे लागते. एक वर्षाच्या मुदतीत त्यातील गॅस अथवा पावडरची तीव्रता कमी होत असल्याने पुनर्भरण करणे आवश्यक असते. जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या सिलिंडरची मुदत संपून दिड महिना उलटत आला असला तरी त्यांचे पुनर्भरण झालेले नाही. याआधी जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायकांच्या दालनात झालेल्या दुरुस्तीनंतर वायरींग चुकीच्या पद्धतीने दाबल्याने आग लागली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंडर कायम तयार असणे महत्वाचे ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा