नाशिक – सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्तान नॅशनल ग्लास कारखान्यात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसल्याचा अंदाज असून घटनास्थळी सर्वत्र काळ्या धुराचे साम्राज्य पसरल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पाणी टंचाईमुळे आग विझविण्याच्या कामात अवरोध येत होता.

हेही वाचा >>> नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशातील युवाशक्ती नाशिकमध्ये अवतरणार

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात

माळेगाव औद्योगिक वसाहतीत हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीत काचेच्या बाटल्या तयार केल्या जातात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अकस्मात भट्टीचा स्फोट झाल्याचे नाशिक इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले. काही वेळात कारखान्यात आग पसरली. कर्मचाऱ्यांनी सावधानता बाळगत बाहेर धाव घेतली. या घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली गेली. आगीमुळे परिसरात सर्वत्र काळा धूर पसरला. आसपासच्या कामगारांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या बंबांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागल्याचे सांगितले जाते. परिस्थिती गंभीर असल्याने पाण्याचे टँकर पाठवावेत, अशी मागणी घटनास्थळावरून केली जात होती. उपरोक्त कारखान्यातील पाणी उपसणारा पंप वेळेवर सुरू झाला नाही. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी आल्या. निमाचे स्थानिक पदाधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसल्याचे सिन्नर औद्योगिक वसाहत संघटनेचे (सिमा) सचिव बबन वाजे यांनी सांगितले. उपरोक्त कारखान्यातील भट्टी २४ तास सुरू असते. ती बंद करता येत नाही. कारण, ती बंद केल्यावर थंड व्हायला आणि ती पुन्हा कार्यान्वित होताना बराच कालावधी लागतो. भट्टीत स्फोट होण्याआधी सर्व कामगार बाहेर पळाल्याने ते बचावले, असे वाजे यांनी नमूद केले.