महानगरपालिका अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाची थकित रक्कम देण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी नाशिक महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावत आंदोलन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या वतीने थकबारीदारांच्या अंगणात ढोल बजाव आंदोलन करत लाखोंची वसुली करण्यात येत असताना महापालिका प्रशासनाकडून अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे. महापालिकेच्या सर्व विभागांच्या (अपवाद अग्निशमन) सेवाप्रवेश नियमांस महासभेची मंजुरी होऊन प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठवला जातो. त्यास शासन मान्यता नसतांनाही २०२१ मध्ये पदोन्नती देण्यात आली. अग्निशमन विभागाला यापासून वंचित ठेवण्यात आले.

हेही वाचा : नाशिक : सरकार सारथीच्या पाठीमागे ठामपणे उभे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाची थकित रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. या बाबत आयुक्तांनी आदेश देऊनही लेखा विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तांत्रिक अटी दाखवल्या जात असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष जगदिश देशमुख यांनी केला. अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती तसेच कालबध्द पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काम न थांबवता काळ्या फिती लावत कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

Story img Loader