भंगार साहित्य व्यवहारात दलालीच्या वादातून सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची घटना सातपूर-अंबड लिंक रस्त्यावर घडली. यावेळी हवेत दोन फैरी झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक: सिडको कार्यालयाचे कामकाज आता अंशत: सुरु – मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून निर्णयात बदल

अंबड-लिंक रस्त्यावरील रिलायबल वजन काट्यासमोर बुधवारी रात्री ही घटना घडली. भंगार साहित्य व्यवहाराच्या दलालीवरून सोहेल चौधरी व मुन्ना चौधरी यांच्यात बाचाबाची झाली. वाद सोडविण्यासाठी शब्बीर चौधरी तिथे गेला. तेव्हा गुलाम हुसेन शेख हा साथीदारांसह त्या ठिकाणी आला व त्याने शब्बीरला शिवीगाळ केली. हा वाद उपस्थितांनी मिटवला. मात्र नंतर दीड तासाने आसिफ शेख, अली शेख व मुन्ना शेख हे मोटारीतून उपरोक्त ठिकाणी आले. वाहनातून उतरून आसिफ शेखने हवेत गोळीबार केला. काही वेळात संशयित वाहनातून पळून गेले. यावेळी संशयिताने हवेत दोन फैरी झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हवेत गोळीबार करणारा संशयित सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.

हेही वाचा >>>संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने जळगावात ठाकरे गटाचा जल्लोष

भंगार बाजाराने गुन्हेगारीला बळ…
अंबड लिंक रस्त्यावरील चुंचाळे शिवारातील भंगार बाजार अनेक वर्षांपासून गाजत आहे. या बाजारामुळे गुन्हेगारी वाढल्याची स्थानिकांची भावना आहे.अनधिकृत भंगार बाजार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही वर्षांपूर्वी हटविला गेला होता. मात्र नंतर काहींनी बांधकामे नियमानुसार करून व्यवसाय कायम ठेवला. या व्यवसायात परप्रांतियांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी कुणाला जुमानत नाही. त्यातून वाद घडतात. गोळीबाराची घटना त्याचा एक भाग असल्याचे दिसत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in the air on the satpur ambad link road due to a scrap deal dispute amy
Show comments