धुळे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आयोजित पहिल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ७४ गुंतवणूकदारांनी तब्बल एक हजार ६६२ कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली. उद्योग विभागाशी सामंजस्य गुंतवणूकदार उद्योगांचे करारही झाले. यामुळे जिल्ह्यात किमान चार हजार २९१ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

धुळे जिल्हा उद्योग केंद्रातर्फे प्रथमच अशा गुंतवणूक परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते परिषदेचे उदघाट्न झाले. हॉटेल गणपती पॅलेसमध्ये ही परिषद झाली. जिल्हाधिकारी गोयल यांनी, धुळे जिल्ह्याचे भौगोलीकदृष्ट्या असलेले महत्व, राष्ट्रीय महामार्गाची उपलब्धता, देशातील इतर राज्ये व शहरांशी असलेली जोडणी, मुबलक जागा,पाणी व कुशल मनुष्य बळ याबाबत माहिती देऊन धुळे जिल्ह्यात उद्योग स्थापन करण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे नमूद केले.

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”

हेही वाचा…तुम्ही दहा वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले; नाना पटोले यांचा अमित शहा यांना टोला

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी प्रास्ताविकातून गुंतवणूकदार व शासनाचे विविध विभाग यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. मैत्री कक्षाचे प्रदिप दळवी यांनी मैत्री कायदा व एक खिडकी योजना याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, मैत्री कक्षाचे प्रदिप दळवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे गावित, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आर. के. शर्मा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पाखले, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी नितीन बंग, उद्योजक भरत अग्रवाल, नितिन भामरे व लघु उद्योग भारतीचे जाखडी उपस्थित होते.

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीची धामधूम…राज ठाकरे, शरद पवार नाशिक दौऱ्यावर

गुंतवणूक करणारे उद्योग

मध्य भारत ॲग्रो प्रॉडक्ट -५५० कोटी
कृष्ण कोटेक्स-१९१.६९ कोटी
रामा फॉस्फेट-६८.५० कोटी
येसेरोला कोटेक्स, पार्थ कोटस्पिन प्रा. लि., परम स्पेनर प्रा. लि. प्रत्येकी ५० कोटी
एकदंत स्पीनिंग प्रा.लि. -४९.५० कोटी

Story img Loader