नाशिक – राज्य संरक्षित स्मारक असलेल्या येथील श्री सुंदरनारायण मंदिराचे काम वेगवेगळ्या कारणामुळे काही वर्षांपासून रखडत सुरु होते. आता पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मंदिराचा कळस चढविण्यात आला आहे.

श्री सुंदरनारायण मंदिराचे जतन आणि दुरुस्तीचे काम पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत असलेल्या सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, नाशिक या कार्यालयामार्फत सुरु करण्यात आले आहे. साधारणत: पाच वर्षाहून अधिक काळापासून हे काम सुरू आहे. मंदिर नुतनीकरणाचे काम हाती घेतल्यापासून पुरातत्व विभागाला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरूवातीला मंदिरातील मूर्ती शेजारील वाड्यात स्थलांतरीत केल्यानंतर मंदिराच्या नुतनीकरणास सुरूवात झाली. त्या वेळी तेथील रोहित्र, जागा यासह वेगवेगळ्या अडचणी सोडविण्याची तयारी होत असतांना करोनाचे संकट उभे राहिले. या काळात मंदिरासाठी परप्रांतातून आलेले कारागीरही स्थलांतरीत झाले. मंदिर बांधणीसाठी आवश्यक दगड मिळवितांना पुरातत्व विभागाची दमछाक झाली.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

हेही वाचा >>> जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; परिचारिकेला मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन

अखेर अडथळ्यांची शर्यंत पार करत मंगळवारी श्री सुंदरनारायण मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले. या मंदिराचे काम सुरु करण्याआधी कळसामध्ये मिळालेले टाक, कलश, आणि नाणी यांची शात्रोक्त पद्धतीने पूजा करून मंदिर ट्रस्टच्या पुजारींद्वारे कळस ठेवताना संबंधित वस्तू पुन्हा ठेवण्यात आल्या आहेत. श्री सुंदरनारायण मंदिराचे गर्भगृह, शिखराचे जतन आणि दुरुस्ती काम पूर्वी असलेल्या शिल्पकामाप्रमाणेच आणि पुरातत्वीय संकेतानुसार पूर्ण करण्यात .येत आहे. यासाठी पुरातत्व विभागाला उपलब्ध निधीनुसार काम सुरू असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या कळसाची स्थापना झाली असली तरी मंदिराचे इतर कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. ज्यात शिखरावरील शिल्पकामे अधिक टोकदार करणे, गर्भगृहातील उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सहायक संचालिका आरती आळे यांनी सांगितले. नाशिककरांसाठी सुंदर नारायण मंदिर लवकरच खुले होईल, असा विश्वास पुरातत्व विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.