जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील चारवर्षीय बालकाला लेप्टोस्पायरोसिस या आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली असून, जिल्ह्यात पहिल्यांदाच या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. लेप्टोस्पायरोसिस आजाराची लागण उंदीरसारख्या प्राण्यांची लघुशंका पाण्यात मिसळल्यानंतर ते मानवी शरीराच्या जखमांमध्ये शिरून होते, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बहेकर यांनी सांगितले.

दरम्यान, रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नसली, तरी पुढील १४ दिवस डांगरी गावात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. करोनासारख्या महामारीतून सावरत आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे. पुन्हा नवनवीन आजारांनी डोके वर काढले असल्याचे जिल्ह्यात आढळून आलेल्या लेप्टोस्पायरोसिस आजाराच्या रुग्णावरून निष्पन्न झाले आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडून पूर्णपणे काळजी व दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच लेप्टोस्पायरोसिस आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील चार वर्षांच्या बालकाला या आजाराची लागण झाली आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बहेकर, जिल्हा साथरोग अधिकारी प्रमोद पांढरे, डॉ. वाभळे, हिवताप नियंत्रण विभागाचे आरोग्य सहाय्यक विपुल लोणारी, धनराज सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, डॉ. रनाळकर यांच्यासह आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांच्या पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली. गावात पथक ठाण मांडून असून, रोज गावात पाहणी करीत ग्रामस्थांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांमार्फत सर्वेक्षणही करण्यात येणार असल्याचे डॉ. बहेकर यांनी सांगितले.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश

हेही वाचा – सिडकोत पुन्हा एकदा दिवसाढवळ्या युवकाची हत्या

हेही वाचा – कांदा तिढा कायम; बाजार समित्यांमध्ये ‘नाफेड’ची खरेदीच नाही

डॉ. बहेकर यांनी सांगितले की, संबंधित कुटुंब परजिल्ह्यात गेले होते. परत आल्यानंतर बालक आजारी पडल्याने त्याला धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे लेप्टोरोयसिस आजाराचे निदान झाले. उपचार करून बालक व कुटुंबीय डांगरी येथे त्यांच्या घरी आले आहे. पथकाने त्यांची भेट घेत तपासणीही केली. आता बालकाची प्रकृती स्थिर असून, कुटुंबातील कोणालाही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, दक्षता म्हणून आणखी तपासणी करण्यात येणार आहे. रोगबाधित प्राण्यांच्या लघुशंकेतून लेप्टोस्पायरोसिस आजार फैलावतो. त्यात तीव्र ताप, अंगदुखी, डोळे लालसर होणे, तीव्र डोकेदुखी, अशी लक्षणे दिसून येतात. प्रामुख्याने मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर या भागांत, तसेच भात व ऊस लागवडीच्या क्षेत्रात या आजाराचे रुग्ण आढळून येतात. आजारावर लवकर उपचार न झाल्यास छातीत पाणी जाऊन रुग्णांची प्रकृती गंभीर होते.

Story img Loader