लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: एरंडोल तालुक्यातील मुलींच्या वसतिगृहात पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडूनच देण्यात आलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. गणेश पंडित असे नराधमाचे नाव आहे.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

एरंडोल तालुक्यातील एका गावात शासनमान्यता असलेल्या खासगी संस्थेचे मुलींचे वसतिगृह जूनमध्ये बंद पडल्यानंतर तेथील पाच मुलींना जळगावातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. या मुलींनी वसतिगृहात काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडे गावातील वसतिगृहातील काळजीवाहकाने अत्याचार केल्याचा प्रकार कथन केला. ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या कालावधीत गावातील मुलींच्या वसतिगृहात पाच मुली अभिरक्षेत असताना तेथील काळजीवाहक गणेश पंडित याने पाचही मुलींवर वेळोवेळी अत्याचार केले. यासंदर्भात मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिकांसह सचिवांकडे वेळोवेळी तक्रार करूनही त्यांनी टाळाटाळ केल्याचा प्रकारही समोर आला.

आणखी वाचा-नंदुरबार: शेती कसण्याच्या वादातून गोळीबार, शहादा तालुक्यात दोन जणांचा मृत्यू

दरम्यान, यासंदर्भात जळगावच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी एरंडोल येथील पोलिसांना पत्र दिले. त्याअनुषंगाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एरंडोल येथील पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. वसतिगृह बंद होईपर्यंत म्हणजे वर्षभर मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर अत्याचार करणारा काळजीवाहक गणेश पंडित याला अटक करण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडितला साथ देणारी पत्नी, वसतिगृह अधीक्षिकांसह सचिवांनाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश पंडित, सचिव भिवाजी पाटील, वसतिगृहाच्या अधीक्षिका अरुणा पंडित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader