नाताळ आणि नववर्ष स्वागतानिमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात एक दिवसीय मद्य सेवनाचे सुमारे पाच लाख परवाने वाटप करण्यात आले आहेत. हे परवाने मद्यविक्री करणार्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांनी दिली. बनावट मद्य आणि अन्य राज्यातून होणारी चोरटी वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके तैनात केल्याचेही शेवरे यांनी सांगितले.
हेही वाचा- नंदुरबार जिल्ह्याला आरोग्य सुविधेसाठी १३ कायाकल्प पुरस्कार
नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल व्यावसायिकांसह मद्यविक्रेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानेही मद्य सेवनाचे एकदिवसीय परवाने वितरीत करुन शासनाच्या तिजोरीत मोठा महसूल जमा करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. या विभागाने नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी तब्बल पाच लाख परवाने वितरीत केले आहेत. मद्य खरेदी करण्यास गेलेल्या नागरिकांना त्याच दुकानांवर मद्यसेवनाचे एकदिवसीय परवाने मिळतील. देशी मद्य परवान्यासाठी दोन रुपये तर, विदेशी मद्य परवान्यासाठी पाच रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक शेवरे यांनी दिली. हे परवाने मद्यविक्री दुकानांवरच उपलब्ध होणार असल्याने एकदिवसीय परवान्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे चकरा मारण्याचा नागरिकांचा त्रास वाचणार आहे.
हेही वाचा- नाशिक: शहरात नायलॉन मांजाची विक्री सुरुच; दोन जणांविरुध्द गुन्हा
जिल्हा सीमेवर भरारी पथके
३१ डिसेेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात बनावट मद्याची तस्करी रोखण्यासाठी तसेच अन्य राज्यातून मद्याची चोरी करुन शासनाचा महसूल चुकवू होऊ नये, याकरीता चार भरारी पथक हे तैनात करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक शेवरे यांनी दिली.