लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : पंचवटीतील विडी कामगार नगर येथील युवक हत्या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या विभाग एकच्या पथकाला यश आले.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

विशांत भोये (२९, रा. विडी कामगार नगर) याने परिसरातील अल्पवयीन मुलांना खेळण्यावरून हटकले होते. याचा राग मनात ठेवत मुलांच्या पालकांनी विडी कामगार नगरात विशांत याच्यावर शनिवारी रात्री धारदार कोयत्याने वार करुन त्याची हत्या केली. हत्येनंतर विशांतच्या नातेवाईकांनी आणि आप्तांनी संशयितांच्या वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ केली होती. परिसरात काही काळ तणाव होता. मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची घोषणा करुन जमावाने रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिसांनी मध्यस्ती केल्याने हे प्रकरण निवळले.

आणखी वाचा-समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसनाचे संकेत

स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या पथकाने संशयितांना पकडण्यासाठी पथक स्थापन केले होते. अंमलदार विलास चारोस्कर यांना गुन्ह्यातील संशयित येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येवला येथे रवाना झाले. नगरसूल परिसरात शोध घेत सूरज मोहिते (२२), रवींद्र मोहिते (४३) आणि एका महिलेस ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. विल्होळी येथील जैन मंदिर परिसरात इतर संशयित येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा विभाग एक आणि अंमलदार यांना मिळाली. पथकाने विल्होळीतील जैन मंदिर परिसरातून मच्छिंद्र जाधव (३८, रा. विडी कामगार नगर) याला तसेच एका महिलेस मुंबई नाका परिसरातून ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचही संशयितांना आडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.