शहरातील वेगवेगळ्या भागात पाच जणांनी आत्महत्या केली. यातील चार जणांनी गळफास घेतला. तर, एकाने विषारी औषध सेवन केले. सिडकोतील उपेंद्रनगर भागात रामदास रोकडे (५०, सहावी योजना) यांनी राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. याबाबत समाधान रोकडे यांनी माहिती दिली. दुसरी घटना कर्मयोगी नगरातील रुंग्टा ऑरोझन अपार्टमेंट येथे घडली. सागर कुमार (२९) या युवकाने घरातील पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला. याबाबत सुयोग ढेपे यांनी माहिती दिली.

तिसरी घटना उंटवाडी भागातील साईराम रो हाऊस येथे घडली. रवींद्र पाटील (४८, कालिका पार्क) यांनी घरातील भिंतीच्या हुकाला लहान बाळासाठी बांधलेल्या झोळीच्या दोरीने गळफास घेतला. याबाबत मुलगा कुणाल पाटील यांनी माहिती दिली. कामटवाडा भागातील साई समर्थ रो हाऊस येथे राहणाऱ्या महेश आडिवडेकर (२९) या युवकाने घरातील छताच्या हुकास साडी बांधून गळफास घेतला. याबाबत आकाश घाडगे यांनी माहिती दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पाचवी घटना पंचवटी टॉवरसमोरील मिस्त्री पार्कमध्ये घडली. विकास भट (४०) यांनी घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या बाबत पोलीस नाईक नीलेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्यांमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या