इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिकरोड येथील एकाच कुटूंबातील चौघांसह पाच सदस्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेले चौघे अल्पवयीन आहेत. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिकरोड येथील गोसावी वाडीत राहणारे खान कुटूंबिय रिक्षातून मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नाशिक : पेठरोडवर पाच मोटारसायकलींसह रिक्षाची तोडफोड

सायंकाळी सहाच्या सुमारास अनस खान (१५), नाझिया खान (१५), मिस्बाह खान (१६), हनिफ शेख (२४), ईकरा खान (१४) हे धरणाच्या पाण्यात खेळत होते. खेळत असतांना खोलीचा अंदाज न आल्याने एकजण बुडू लागल्यावर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पाचही जण बुडाले. मुलांच्या आईने आरडाआरेड केल्यानंतर स्थानिक मदतीला धावून आले. स्थानिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत.