जळगाव – जिल्ह्यातील भुसावळ शहरात शुक्रवारी अमरदीप टॉकीजजवळील चहाच्या दुकानात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर फरार झालेल्या पाच संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून चार गावठी बंदुका, तीन काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेहरीन अहमद (रा.मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) हा शुक्रवारी सकाळी चहा पिण्यासाठी खडका रस्त्यावरील अमरदीप टॉकीजजवळच्या दुकानात गेला होता. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या संशयितांनी गावठी बंदुकीतून त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्यात तेहरीनचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडून पोलिसांचा धाक उरला नसल्याची प्रतिक्रिया उमटली होती. पोलीस गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेत नसल्याने भुसावळमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोपही नागरिकांकडून झाला.

हेही वाचा – नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त

हेही वाचा – नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात

या प्रकरणातील संशयित तनवीर पटेल, अनवर पटेल, रमीज पटेल, साहिल शेख, मजीद पटेल, अदनान शेख यांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी रमीज पटेल (३२, रा.पटेल कॉलनी, भुसावळ) यास शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेकडून बल्लारशाह (जि.चंद्रपूर) येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सदर गुन्ह्यातील इतर संशयित हे मनमाड शहराच्या जवळपास लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने अदनान शेख (२९), साहिल शेख (२१) आणि इतर दोन संशयितांना मनमाड येथून शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपये किंमतीच्या चार गावठी बंदुका आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.