नाशिक – सिडकोतील शिवाजी चौक व्यापारी संकुलाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी भाजी विक्रेता संदीप आठवले (२८) हत्या प्रकरणी पाच संशयितांना न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तिघा अल्पवयीनांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

गुरुवारी दुपारी संदीप आठवले (२२) हा त्याच्या भावासह शिवाजी चौकातील व्यापारी संकुलात असताना त्या ठिकाणी आठजणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने संदीपवर वार केले होते. गंभीर दुखापतींमुळे संदीपचा मृत्यू झाला होता.

pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
Akhilesh Shukla
कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
Badlapur sexual assault case, akshay shinde parents,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न
Thane Creek to be monitored by High Court Supreme Court directives strengthen conservation efforts
ठाणे खाडीची देखरेख उच्च न्यायालयामार्फत; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे संरक्षण प्रयत्नांना बळ
sangli murder case
सांगलीतील खून प्रकरणात पसार आरोपी अटकेत, खेड शिवापूर भागात कारवाई
Case registered against four guilty officials in LPG gas leak at Jindal Company in Jaigad
जयगड येथील जिंदाल कंपनीच्या एलपीजी वायू गळतीतील चार दोषी अधिका-यांवर गुन्हा दाखल; कंपनी लवकरच चौकशी अहवाल सादर करणार

हेही वाचा – नाशिकमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड, तीन संशयित ताब्यात

हेही वाचा – जळगाव : जामनेरनजीक अपघातात तरुण ठार, पाच जखमी

गुन्हेगारांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. एमआयडीसी पोलीस चौकीचे उपनिरीक्षक संदीप पवार आणि अंमलदार जनार्धन ढाकणे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने मखमलाबाद येथे जाऊन मुख्य संशयित ओम पवार उर्फ मोठा ओम्या खटकी (१९, पाटीदार पार्क जवळ, आव्हाड पेट्रोल पंपासमोर, पाथर्डी फाटा), ओम चौधरी उर्फ छोटा खटकी (१९, कृष्णा अपार्टमेंट, शिवप्रताप चौक, नवीन नाशिक), साईनाथ मोरताटे उर्फ मॅगी मोऱ्या (१९, रा. महादेव मंदिरासमोर, पवननगर), सौरभ वडनेरे उर्फ बाळा (१९, रा. चामुंडा अपार्टमेंट, पांडव नगरी, इंदिरानगर), अनिल प्रजापती (१९, राजरत्न नगर,नवीन नाशिक) यांच्यासह तीन विधीसंघर्षितांना ताब्यात घेतले. पाच संशयितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तीन अल्पवयीनांना बाल न्यायालयात उभे केले असता त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली.

Story img Loader