जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर येथील बंद घर फोडत दागिन्यांसह रोकड असा लाखोंचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून या गुन्ह्यातील पाच संशयितांना अटक केली आहे. यात महिलेचा समावेश आहे. संशयितांकडून सुमारे १६ लाख, ९०  हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपासाधिकारी उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी यासंदर्भात माहिती दिली. जामनेर तालुक्यातील पहूर येथे बंद घर फोडून लाखोंचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल लांबविल्या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीतील संशयित जळगावातील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली.

हेही वाचा >>> जळगाव : रस्तेकामांची गुणवत्ता न राखल्यास मक्तेदारावर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत सय्यद सरजील सय्यद हारुन (२७, रा. मास्टर कॉलनी, जळगाव), अनिल चौधरी (४०, रा. अयोध्यानगर, जळगाव), सय्यद अराफत सय्यद फारुक (३३, रा. तांबापुरा, जळगाव), सय्यद अमीन ऊर्फ बुलेट सय्यद फारुख (रा. तांबापुरा, जळगाव) आणि भावना जैन (लोढा) यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १६ लाख,९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पाचही जणांना पुढील कारवाईसाठी पहूर येथील पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Story img Loader