लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील पाच संशयितांना धरणगाव येथील पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांकडून मोटारीसह कुर्हाड, सळई यांसह इतर साहित्य हस्तगत केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री गस्तीवर असलेल्या धरणगाव येथील पोलिसांच्या पथकाला पाळधी ते सावदा शिवारात मोटार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसून आले. पथकाने तातडीने मोटारीत बसलेल्या संशयितांची चौकशी केली. मोटारीत दरोड्यासाठी लागणारी कुर्हाड, सळई, सुताचा दोर असे साहित्य मिळून आले. त्यानंतर संशयित पाच तरुणांची अंगझडती घेतली.

हेही वाचा… चंद्रपुरात १०० रुपयात मिळणार ‘शेअरिंग सायकल’; नेमका काय आहे उपक्रम, जाणून घ्या…

एकाच्या कमरेला चाकू आणि दुसर्याकडे मिरची पावडर, पकड मिळून आली. अनिल भिल (२१), जानमन बारेला (२२, दोन्ही रा. मोहाला-चापोरा, बडवानी, मध्य प्रदेश), नानूसिंग बारेला (२५, रा. रजानेमल-चोपारा, बडवानी, मध्य प्रदेश), भाईदास भिलाला (२९), हत्तर चव्हाण-भिलाला (२२, दोन्ही रा. हिंदली, बडवानी, मध्य प्रदेश) अशी अटकेतील संशयितांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध धरणगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five suspects were arrested before the robbery by the dharangaon police jalgaon dvr