जळगाव : कासवांची तस्करी करताना नशिराबाद येथील तिघांना वनविभागाच्या पथकाने पकडले. याप्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद (रा. नशिराबाद) अशी या संशयितांची नावे आहेत.

हेही वाचा…जळगाव : गोळीबारात जखमी भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांचा मृत्यू

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

शहरातील मुंबई- नागपूर महामार्गावरील कालिंकामाता मंदिराच्या पुढे कासवांची विक्री करणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाचे उपसंचालक योगेश वरकड यांना मिळाली. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक प्रवीण ए, सहायक वनसंरक्षक यू. एम. बिराजदार यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, नितीन बोरकर, वनपाल योगेश दीक्षित, संदीप पाटील, वनरक्षक भागवत तेली, अजय रायसिंग, हरीश थोरात, दीपक पाटील, गुलाबसिंग ठाकरे, भगवान चिम यांच्या फिरत्या पथकाने शहरातील कालिंकामाता मंदिराजवळ सापळा रचला. तेथे संशयास्पद वाटणार्‍या संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद यांची विचारपूस केली. त्यांच्याकडे तीन कासव मिळून आले. त्यांना पथकाने ताब्यात घेतले. मानद वन्यजीवरक्षक विवेक देसाई व उमेश पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तिघांविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला. सहायक वनसंरक्षक बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर तपास करीत आहेत.