नाशिकमध्ये सोमवारी (३१ जानेवारी) बिबट्याने (Leopard) नागरी वसाहतीत घुसून तब्बल ७ तास लपंडाव केला. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. अखेर वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करत या बिबट्याला पकडलं आहे. हा बिबट्या सकाळी ७ वाजता जय भवानी रोडवर पाहायला मिळाला. त्यानंतर त्याचा नागरी वसाहतीत वावर होता. अखेर गायकवाड निवास येथे एका कारखाली असताना वनविभागाने त्याला बेशुद्ध करत पकडलं.

नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये सकाळी ७ वाजता एक बिबट्या जय भवानी रोड परिसरात दिसला. आधी एका इमारतीत दिसलेला हा बिबट्या नंतर एका गार्डनमध्ये आणि काही इमारतींच्या समोरही पाहायला मिळाला. बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर वनविभाग घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी बिबट्याचा शोध घेतला, पण बिबट्या न सापडल्याने तो शेजारी असलेल्या जंगलात गेल्याचं बोललं गेलं. मात्र, काही वेळातच हा बिबट्या पुन्हा नागरी वसाहतीत दिसला. त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं गेलं.

mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
really fasting between 5.30 pm and 10 am is best for belly fat loss
सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ
torres fraud case ed raids 13 places in mumbai and jaipur
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः मुंबई व जयपूर येथील १३ ठिकाणी ईडीचे छापे

बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन अखेर बिबट्या जेरबंद

अखेर तब्बल ७ तास लपंडाव खेळल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला गायकवाड निवासमधील एका कारखाली पकडलं. बिबट्या पळून जाऊ नये म्हणून वनविभागाने संपूर्ण कार जाळ्याने घेरली. त्यानंतर बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : रेडिओ कॉलर लावूनही बिबट्या बेपत्ता कसा?

दरम्यान, वनविभाग बिबट्याला पकडत असताना उत्साही नागरिकांमुळे अनेक अडचणीही आल्या. सेल्फी किंवा फोटो काढण्याच्या अट्टाहासामुळे वनविभागाला बिबट्या पकडताना अडथळे आले. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करत अशा उत्साही नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवावं लागलं.

Story img Loader