सध्या राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. राजकारणातील पुनरागमनाला कुटुंबीयांचा विरोध आहे. आता कुटुंबियांना वेळ देणार आहे. आता केवळ आशीर्वादासह मार्गदर्शकाच्याच भूमिकेत राहणार आहे. चाळीस वर्षांत जे चांगले करता आले, ते करण्याचा प्रयत्न केला. शहराचा विकास थांबला आहे. भेटायला येणारे लोक जळगाव खड्ड्यांचे शहर झाल्याचे सांगत. त्यामुळे वाईट वाटत होते. सर्वांशी चर्चा करूनच पुढचे सर्वकाही ठरविले जाईल, असे माजी मंत्री सुरेश जैन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा-

Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
member registration campaign BJP
वर्धा : भाजपसाठी ‘ ५ ‘ तारीख महत्वाची; नेते, पदाधिकारी कामाला लागले
Chhagan Bhujbal alone upset minister post NCP ajit pawar
नाराजी नाट्यानंतर छगन भुजबळ पक्षात एकाकी

तत्कालीन पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणात दोषी ठरविलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ते जळगावात आले. सुमारे साडेतीन वर्षांनंतर आपल्या कर्मभूमीत त्यांचे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास राजधानी एक्स्प्रेसने जळगावात आगमन झाले. त्यांच्या 7, शिवाजीनगर निवासस्थानी जैन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. साडेतीन वर्षांनंतर कर्मभूमीत परतल्याचा मनस्वी आनंद होत आहे. आजवर आपण आयुष्यात अनेक निवडणुका लढविल्या. मात्र, आजच्या इतकी गर्दी पाहिली नाही. जळगावकरांचे प्रेम पाहून आपण भारावून गेलो आहोत. सर्वसामान्यांच्या खूप अपेक्षा आहेत. मात्र, सध्यातरी सक्रिय राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही. मात्र चाहत्यांशी बोलून आपण पुढील दिशा ठरविणार असल्याचेही जैन यांनी आवर्जून नमूद केले.

हेही वाचा-

दरम्यान, रेल्वेस्थानकात जैन यांच्यावर प्रेम करणार्‍या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावत जोरदार स्वागत केले. फलाट क्रमांक दोन ते मोटारीपर्यंत लाल गालिचा अंथरण्यात आला होता. रेल्वेस्थानक ते शिवाजीनगर या त्यांच्या निवासस्थानापर्यंत कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. माजी महापौर रमेश जैन, माजी आमदार मनीष जैन, जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर जयश्री महाजन, महापालिका विरोधी पक्षनेता सुनील महाजन, शरद तायडे, गजानन मालपुरे, नगरसेवक प्रा. सचिन पाटील, माजी उपमहापौर करीम सालार, अमर जैन यांच्यासह समर्थकांनी जोरदार स्वागत केले. समर्थकांसह कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकल्याने माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अमर जैन यांनी जैन यांना सुरक्षा पुरविली.

हेही वाचा-

रात्री उशिरापर्यंत जैन यांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रांतील व घटकांतील नागरिकांनी रीघ लावली होती. संघपती दलिचंद जैन, मेजर नाना वाणी यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांनी जैन यांचे हृदयस्पर्शी स्वागत केले. महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह अन्य समर्थकांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. याप्रसंगी परिसरात हजारो चाहत्यांची उपस्थिती होती.

Story img Loader