जळगाव : अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय ९०) यांचे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २३ ऑगस्ट रोजी दहिवद (ता. अमळनेर) येथील त्यांच्या निवासस्थानापासून दुपारी दोनला निघणार आहे. मायबोली अहिराणीतूनच शपथ घेईन म्हणत संपूर्ण विधानसभा वेठीस धरून विरोधक म्हणून सत्ताधार्‍यांना सळो की पळो करून सोडणारे मुलूख मैदान तोफ म्हणून  माजी आमदार गुलाबराव पाटील यांची ओळख होती.

पाटील हे तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते. शेतकर्‍यांसाठी शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळवणे आदी भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. ते समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांचा महाराष्ट्रभरात दरारा होता. फर्डे वक्ते म्हणूनही ते परिचित होते. साची संदेश वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. दीर्घ काळ जनता दलात राहिल्यानंतर राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी विचारसरणीच्या दमदार फळीतील शेवटचा नेता निखळला.

Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ajit-pawar on sharad pawar
Ajit Pawar on Sharad Pawar : “ते ८५ वर्षांचे अन् मला रिटायर करायला निघालेत”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!
flying squad, seizes more than 2 crore rupees, maharashtra assembly election 2024
वसई-विरार पालिका परिसरात सलग दुसर्‍या दिवशी पैशांचा पाऊस, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Ravindra Apte, former president of 'Gokul' passed away
‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन
Sharad Pawar appeal to give a chance to the new generation print politics news
संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत; नव्या पिढीला संधी देण्याचे शरद पवार यांचे आवाहन