जळगाव – जिल्ह्यात दोन दिवसांत भुसावळ, चाळीसगाव, यावल या तालुक्यांमध्ये चार खून झाल्याने जिल्हा हादरला आहे. यावल तालुक्यातील पिळोदा येथे वृद्ध पित्याचा खून झाल्यानंतर २४ तासांच्या आत रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून प्रौढाचा खून झाला.

भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात १३ जानेवारीच्या सायंकाळी पैशांसाठी मित्रांमध्ये झालेल्या वादातून भावेश भालेराव (२६, रा. भगवान साळवेनगर, फेकरी) याचा खून झाला होता. त्यानंतर रविवारी चाळीसगावमध्ये क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलातील शुभम ओगोणे (२८, रा. चाळीसगाव) याचा चौघांनी खून केला. त्यापाठोपाठ सोमवारी यावल तालुक्यातील पिळोदा येथे लग्न करून न दिल्याने वृद्ध पित्याचा मुलाने कुर्‍हाडीचे वार करुन खून केला. या घटनेला २४ तास उलटत नाही, तोच यावल तालुक्यातील रिधुरी येथे सोमवारी रात्री रस्त्याच्या वादातून धनराज सोनवणे (५०, रिधुरी, यावल) यांचा खून झाला.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”
five year old boy dies after suffocating in car park in garage
गॅरेजमधील मोटारगाडीत श्वास कोंडल्याने पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू

हेही वाचा…जळगावात आदिवासी कोळी समाजाचे झाडाला लटकून आंदोलन

यावल तालुक्यातील रिधुरी गावात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घराच्या वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांत वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन धनराज सोनवणे यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करण्यात आले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हाणामारीत सतीश सोनवणे (३०), आरती सोनवणे (२८) जखमी झाले असून, त्यांना जळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोनी सोनवणे (रा. रिधुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर येथील पोलीस ठाण्यात संशयित सतीश सोनवणे, युवराज सोनवणे, दीपक सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.