लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील ओझर येथील सुरेश साळवे (४०) हे ओणे शिवारात बाणगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले असता बुडाले.
नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना येवला तालुक्यातील सावरगाव येथे घडली. किसन पवार (३८) हे शेततळ्यानजीक काम करीत असतांना तोल गेल्याने ते तळ्यात पडले. शेततळ्यातून बाहरे काढून त्यांना तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा… वसंतराव नाईक महामंडळाच्या जळगाव जिल्हा व्यवस्थापकासह कर्मचार्यास लाच घेताना अटक
परंतु, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. येवला तालुक्यातीलच मुखेड येथील अरुण आहेर (४५) यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. सुरगाणा येथील रोकडपाडा परिसरातील मधुकर गावित (३२) यांचा मृतदेह पाझर तलावात आढळून आला. या प्रकरणी बाऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.