धुळे: नाशिकहून धुळ्याकडे येताना चांदवड शिवारातील सोग्रस फाट्याजवळ सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात धुळ्यातील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव (४८) यांच्यासह चार जण ठार झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर स्विफ्ट कार कंटेनरवर धडकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अहिरराव आणि त्यांचे साथीदार नाशिक येथे उपचारार्थ गेलेल्या भूषण देवरे यांची विचारपूस करण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता नाशिकला गेले होते. रात्री ते उशिरा नाशिकहून स्विफ्ट कारमधून परतीच्या प्रवासाला धुळ्याकडे निघाले असता सोमवारी सकाळी चांदवड शिवारातील सोग्रस फाट्याजवळ त्यांची कार समोरील कंटेनरवर धडकली. ही धडक एवढी भयंकर होती, कार अक्षरशः चक्काचूर झाली.

हेही वाचा… तापीच्या पुरामुळे बाधित शेतीचे पंचनामे करा; गिरीश महाजन यांची सूचना

या अपघातात नगरसेवक अहिरराव (४८), कृष्णकांत माळी (४७), अनिल पाटील (४३) आणि प्रवीण पाटील (४१) यांचा मृत्यू झाला. अहिरराव हे प्रभाग क्रमांक दोनचे भाजपचे नगरसेवक होते. अपघाताची माहिती मिळताच प्रभागातील रहिवाशांसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहिरराव यांच्या घराकडे धाव घेतली