जळगावातील मुक्ताईनगर येथील बर्‍हाणपूर महामार्गावरील रामभाऊ पेट्रोलपंपासमोर मांडूळ सापाची तस्करी करणार्‍या टोळीला वनपरिक्षेत्राच्या गस्ती पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मांडूळ साप हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नाशिक : इगतपुरीत तलावात बुडून तिघांचा मृत्यू; नातेवाईकांचा ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या

मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रातील बर्‍हाणपूर रस्त्यालगतच्या पेट्रोलपंपासमोर मांडूळ सापाची तस्करी होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्राच्या गस्तीपथकाला मिळाली. वनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक संरक्षक यू. एम. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे, मानद वन्यजीवरक्षक विवेक देसाई, वनपाल दीपश्री जाधव, वाय. जी. दीक्षित, तुळशीराम घरंझाळे, नितीन खंडारे, उल्हास पाटील, संचलाल पवार, शंकर कोळी, रायसिंग पारधी, नरेंद्र बारी, जितेंद्र धांडे, नबाब पिंजारी, योगेश जाधव यांच्या पथकाने सापळा रचत संशयित विजयसिंग राठोड, योगेश राठोड, शांताराम राठोड, रूपेश राठोड (सर्व रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर) यांना अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ साप हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four people were arrested for smuggling mandul snake in jalgaon dpj
Show comments