साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या सप्तश्रृंग गडावर मंगळवारी सकाळी खासगी वाहन उलटल्याने चार जण जखमी झाले. जखमी प्रवाश्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मालेगाव तालुक्यातील झोडगे परिसरातून काही भाविक मंगळवारी सप्तश्रृंग गडावर देवी भगवतीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून गेले होते. गडाचा घाट चढून आल्यानंतर सपाट मैदानाजवळ वाहन बंद पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>जळगाव : सफाई कामगारांचा संप; वाॅटरग्रेस कंपनीकडून थकबाकीसह वेतनवाढीची मागणी

वाहन पुन्हा सुरू करतांना खड्ड्यात अडकले. खड्ड्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात वाहन उलटले. त्यावेळी वाहनात ३२ भाविक होते. वाहन उलटल्यानंतर भाविकांनी आरडाओरड केल्यानंतर आवाज ऐकून इतरांनी अपघातग्रस्त वाहनाच्या दिशेने धाव घेतली.जखमींना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कळवण पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. या वाहनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मंगळवार असल्याने भाविकांच्या वाहनांची गडावर येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने घाटात रांग लागली होती.