लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: पर्यटनाला चालना मिळावी, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणादरम्यान पर्यटनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीने युवा पर्यटन मंडळ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी शाळा तसेच महाविद्यालय स्तरावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक विभागात आतापर्यंत चार शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून शाळांचा अधिक सहभाग वाढण्यासाठी पर्यटन संचालनालयाकडून शैक्षणिक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

youth of Nashik came to Aheri and raped minor girl after friendship through online gaming called Free Fire
गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
RTE, RTE Admission, RTE Admission Registration,
‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…
Nashik Municipal Commissioner Manisha Khatri directed pwd to fix potholes immediately
नाशिक खड्डेमुक्त करण्याची सूचना; मनपा आयुक्तांनी खडसावले
Why is the establishment of the Higher Education Commission delayed print exp
उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?

सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त विद्यालये, महाविद्यालयांमध्ये सातवीपासून पुढील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्यात येणार आहेत. भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासह विद्यार्थी आणि तरूणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन, नेतृत्व आणि सेवा अशी विविध कौशल्ये आत्मसात व्हावीत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरूपात अनुदान म्हणून शाळा स्तरावर एका क्लबसाठी १० हजार आणि महाविद्यालयात २५ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एका क्लबमध्ये २५ विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.

हेही वाचा… नाशिक: जिल्ह्यात सर्पदंशाने दोन जणांचा मृत्यू

यासंदर्भात पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी माहिती दिली. नाशिक विभागात या अनुषंगाने शिक्षण अधिकारी, संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून पत्रव्यवहार झाला आहे. चार शाळांनी यासाठी नोंदणी केली असून धुळे, नाशिकमधील या शाळा असल्याचे त्यांनी सांगितले. ही संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी चित्रकला, निबंध यासारख्या स्पर्धा किंवा अन्य काही उपक्रम घेतले जातील, असे सरदेसाई यांनी नमूद केले.

शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे लक्ष

युवा पर्यटन मंडळ अनोखी संकल्पना असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाची आवड रुजावी यावर याअंतर्गत काम करण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे गरजेचे असून क्लबमधील सदस्यांचे आधार क्रमांक, शिक्षक आणि विद्यार्थी समन्वयकांचे आधार क्रमांक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव अपेक्षित आहेत. क्लब स्थापनेनंतर केलेल्या उपक्रमांची छायाचित्रासह माहिती देणे गरजेचे आहे. मुळात शिक्षण विभाग आणि पर्यटन यांचे फारसे सख्य नाही. गेल्या काही वर्षात वेगवेगळी कारणे देत शैक्षणिक सहलीला फाटा दिला जात असतांना पर्यटन क्लब उपक्रम कितपत यशस्वी होईल, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. वास्तविक जिल्हा तसेच नाशिक विभागात गड, किल्ले, पर्यटन स्थळे भरपूर आहेत. मात्र तो इतिहास आजही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेला नाही. ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी क्लब उपक्रम माध्यम ठरेल. यासाठी शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader