धुळे : शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात मंगळवारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये गॅस टँकरचाही समावेश असून टँकरला गळती लागली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कंटेनर आणि मालमोटार या दोन वाहनांचा अपघात झाल्याने घाटात वाहतूक खोळंबली असताना उभ्या गॅस टँकरला मागून दुसरे वाहन येऊन धडकले. त्यात इतर काही वाहनांचेही नुकसान झाले. पोलीस प्रशासनातर्फे खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलास तसेच आपत्कालीन विभागाला बोलविण्यात आले. अपघातात एक चालक जखमी आहे. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लळिंग घाट परिसरात कायमच अपघात होत असतात.
धुळ्याजवळील लळिंग घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात
शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात मंगळवारी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातग्रस्त वाहनांमध्ये गॅस टँकरचाही समावेश असून टँकरला गळती लागली नाही.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-09-2023 at 14:34 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four vehicle accident at laling ghat near dhule ysh