तालुक्यातील एका गावात राहणार्‍या अकरा वर्षीय मुलीला घड्याळ देण्याचा बहाणा करून तिचा विनयभंग करणार्‍या तरुणाला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी आणि सोळा हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. विशेष पोक्सो न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी हा निर्णय दिला.

हेही वाचा: मालेगाव: विकास कामांसाठी शिंदे गटावर पालिकेला टाळे ठोकण्याची वेळ

जळगावलगतच्या एका गावात ही मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. घड्याळ देण्याच्या बहाण्याने मुलीला मनोज सोनवणे (२७, रा. ममुराबाद, ता. जि. जळगाव) याने १७ जुलै २०१७ रोजी दुपारी घरात बोलावून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात मनोज सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हा खटला पोक्सो न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात सरकारपक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित व तिच्या आईची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी सहकार्य केले.

Story img Loader