धुळे – बनावट स्वाक्षरी आणि अंगठ्याचा वापर करून धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चिमठाणे (ता. शिंदखेडा) शाखेतून तत्कालीन शाखाधिकारी तथा रोखपाल यांनी ५३ लाख ९० हजार ५५८ रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चिमठाणे शाखेत एक एप्रिल २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हा अपहार झाला. या कालावधीत अरुण पाटील (५३, रा. निमडाळे, जि. धुळे) यांच्यावर व्यवस्थापक तथा रोखपाल या दोन पदांची जबाबदारी होती. पाटील यांच्या कारकिर्दीत गरीब, निरक्षर खातेदारांच्या बचत खात्यातून त्यांची बनावट स्वाक्षरी आणि त्यांच्या अंगठ्याचा वापर करुन पैसे काढण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक व्यवस्थापन, ठेवीदार आणि खातेदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागल्याने याप्रकरणी तक्रार दाखल झाली. या तक्रारीमुळे कथित आर्थिक अपहाराची चौकशी करण्यासाठी अब्दुल शेख, सुभाष साबरे आणि कांतिलाल खरे यांची चौकशी समिती नेमण्यात आली.

हेही वाचा – नाशिक : संपाचा रुग्णालयांमधील कामकाजावर परिणाम, प्रशिक्षणार्थी परिचारिकांकडून आरोग्य सेवा

शासनातर्फे प्राप्त झालेली अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा झाली की नाही, याची सर्वप्रथम या समितीने तपासणी केली. पैसे जमा झालेल्या खात्यांशी संबंधित खातेदाराच्या स्वाक्षरीचे नमुने तपासण्यात आले. खाते उघडताना घेतलेल्या स्वाक्षरीशी ते मिळते जुळते आहेत की नाही, याची खात्री करण्यात आली. स्वाक्षरी नमुन्यांशी तफावत आढळून आलीच पण मृत खातेदारांच्या बचत खात्यातूनही अनुदानाचे पैसे वर्ग झाल्याचे आढळून आले.

हेही वाचा – नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट, कोषागारातील कोट्यवधींच्या उलाढालीवर परिणाम

संबंधित खातेदारांचे मृत्यूचे दाखले, खात्यातून पैसे काढल्याचे खातेउतारे असे अनेक कागदोपत्री पुरावे चौकशीत उपलब्ध झाल्याने अखेर बँकेचे शाखाधिकारी प्रभाकर तावडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून तत्कालीन शाखाधिकारी अरुण पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.