लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
नाशिक: क्रेडिट कार्ड कार्यान्वित करण्याच्या भूलथापा देत संशयितांनी पडताळणी सांकेतांक (व्हेरिफिकेशन कोड) घेऊन सुमारे पावणेपाच लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन लंपास केल्याचे उघड झाले आहे.
आणखी वाचा-नाशिक : नरेश कारडा विरोधात आणखी एक गुन्हा
याबाबत सचनय चॅटर्जी (४०, चाणक्यनगर, खुटवडनगर) यांनी तक्रार दिली. चॅटर्जी यांच्याशी १० ऑक्टोबर रोजी १८६०४१९५५५५ या क्रमांकावरून संशयितांनी संपर्क साधला होता. क्रेडिट कार्ड कार्यान्वित करण्याच्या बहाण्याने संशयितांनी सांकेतांक घेतला. नंतर वारंवार बँकेचे भ्रमणध्वनी ॲप्लिकेशन लॉग इन आणि लॉग आउट करण्यास सांगून बोलण्यात गुंतवून चार लाख, ६३ हजार ४६० रुपये परस्पर काढून लंपास केले. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 11-11-2023 at 14:55 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud under the guise of executing credit card mrj