लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार कायम घडत असले तरी अशा घटनांमधून बोध न घेता व्यापाऱ्याची अधिक माहिती न काढता व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार होतच आहेत. माडसांगवी येथील द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याने १२ लाखाहून अधिक रकमेला फसवणूक केली. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारभारी निमसे यांची माडसांगवी परिसरात द्राक्ष शेती आहे. त्यांच्याशी संशयित मोहमंद उस्मानी (रा. बिहार) या परप्रांतीय व्यापाऱ्याने ओळख वाढवि विश्वास संपादन केला. ३५ रुपये किलो दराने त्यांच्या शेतातील द्राक्षमाल १३ लाख, ९६ हजार ७०३ रुपयांना खरेदी केला. पहिल्या टप्प्यात व्यापाऱ्याने तीन लाख, ५० हजार रुपये दिले. परंतु, उर्वरित १२ लाख, ४६ हजार ७०३ रुपये देण्यास टाळाटाळ केली. सातत्याने पाठपुरावा करुनही पैसे न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे निमसे यांच्या लक्षात आले. त्यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud with grape farmer by trader in nashik mrj
Show comments