लोकसत्ता वार्ताहर

धुळे: पुढे खून झाला असल्याने सर्व दागिने काढून ठेवा, अशी थाप मारत पोलीस असल्याचे खोटे सांगून दोघांनी वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन, दोन अंगठ्या असा ९३ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?

आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात विसर्जनावेळी तरुण बुडाला, शोध चालू

यासंदर्भात शिंदखेडा तालुक्यातील विठाई येथील बापूराव पवार (६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता शिंदखेडा तालुक्यातील गोराणे फाट्यावर दोन जण मोटारसायकलने आले. त्यापैकी एकाने बापूराव यांना आपण पोलीस असल्याचे सांगून इकडे खून झाला असताना तुम्ही एवढे सोने घालून कुठे चाललात, अशी विचारणा केली. अंगावरील दागिने काढून ठेवा, असे म्हणत दोघांनी पवार यांना ४५ हजार रुपयांची सोन्याची चैन, दोन अंगठ्या त्यांच्याकडील एका कागदात ठेवायला सांगितले. कागदाची पुडी बांधून ती बापूराव यांना दिली. त्यानंतर दोघेही निघून गेले. बापूराव यांनी खिशातील रुमालात कागदी पुडी ठेवली. घरी गेल्यावर ती उघडली असता पुडीत त्यांना खडे बांधलेले दिसले. आपणास फसविण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी नरडाणा पोलीस ठाणे गाठले