धुळे : सरकारी नोकरीला लावून देतो, असे सांगून २० लाख ७५ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चंद्रभान ओसवाल याने धुळ्यातील गोपाल टी  हाऊसचे माजी कर्मचारी दिनकर तांबे यांना मुलगा, मुलगी आणि सुना यांना सरकारी नोकरीत लावून देण्याचे आमिष दाखवित २० लाख ७५ हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. तथापि यापैकी कुणालाही नोकरी मिळवून दिली नाही. यामुळे तांबे यांनी रक्कम परत मागितली असता ओसवालने उडवाउडवीची उत्तरे देऊन तांबे कुटुंबियांची बोळवण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांच्या नावाचे खोटे पत्र आणि खोटा आदेश दाखवून फसवणूक केली. तांबे यांनी ॲड. चैतन्य भंडारी यांच्या माध्यमातून न्यायालयात धाव घेतली. भंडारी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. प्रविण सागडे यांनी तांबे यांच्या बाजूने निकाल देत ओसवालविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश धुळे शहर पोलीस ठाण्याला दिले. भंडारी यांना ॲड. प्राजक्ता राणा, ॲड. भाग्यश्री नागमोती यांचे सहकार्य लाभले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud with the lure of employment court order to file a case ysh
Show comments