लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : शहर परिसरात अनेकांची फसवणूक करून त्यांच्याकडील चारचाकी वाहनांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्याकडील तीन चारचाकी वाहने ताब्यात घेतली. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा-अरे, बापरे…रुग्णालयात बिबट्या, शहाद्यात तीन तासानंतर बिबट्याला पकडण्यात यश

भद्रकाली परिसरातील एका व्यक्तीची दोन लाख रुपयाची चारचाकी त्याच्या परिचयाच्या व्यक्तीने नेली. संबंधित व्यक्तीला न कळवता ते वाहन दुसऱ्याच व्यक्तीला विकण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शादाब शेख याला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता या गुन्ह्यातील चारचाकी वाहनाची अकोला येथे विक्री केल्याचे उघड झाले. तसेच नाशिक येथील अजून दोन वाहनांची नाशिक आणि मुंबईत विक्री केल्याची कबुली शेखने दिली. भद्रकाली पोलिसांनी तीन चारचाकी वाहने ताब्यात घेतली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraudulent sale of vehicles four vehicles seized from suspect mrj
Show comments