नाशिक – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत दारु पिऊन करु नये, व्यसनांपासून दूर राहावे, हा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शहरात अनोखा उपक्रम राबविला. ‘द दारूचा नव्हे तर द दुधाचा’ हा उपक्रम नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबविला गेला. या अनोख्या उपक्रमाचे नाशिककरांनी स्वागत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही वर्षांपासून कोणताही सण, उत्सव, समारंभानिमित्ताने मद्यप्राशन करणे तसेच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करणे, या सामाजिक स्वास्थ्याला व पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या गोष्टी करण्याकडे कल वाढला आहे. हे समाजसाठी धोकादायक आहे. कोणत्याही व्यसनामुळे संबंधित व्यक्तीचे आणि त्याच्या कुटूंबाचे आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. सर्वाधिक वाईट गोष्ट म्हणजे व्यसन केल्याने व्यसनी व्यक्तीचा विवेक हळूहळू संपुष्टात येतो. त्यावेळी ती व्यक्ती व त्याचे कुटूंब सामाजिक पत, प्रतिष्ठा गमावून बसते. त्यातून संबंधित व्यक्ती अंधश्रद्धेला बळी पडण्याची शक्यता वाढते.
हेही वाचा >>>मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात संचारबंदी
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर, व्यसनांमुळे उदभवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने येथील हुतात्मा स्मारकाजवळ ,” द दारूचा नव्हे तर, द दुधाचा ” हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. मिलींद वाघ आणि राजू देसले यांच्या हस्ते झाले. यावेळी रस्त्याने जा-ये करणाऱ्यांना विशेषतः वाहन चालक आणि युवावर्ग यांना थांबवून, मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. व्यसनांचे आणि फटाक्यांच्या आतषबाजीचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. नववर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाचा तसेच आपापल्या आवडीनुसार किमान एक नाविन्यपूर्ण सामाजिक काम करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंनिसने तयार केलेल्या व्यसनविरोधी प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्र अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, नितीन बागूल, महेंद्र दातरंगे, ॲड. समीर शिंदे, विजय खंडेराव, प्रा. आशा लांडगे, कोमल वर्दे, लता कांबळे आदी उपस्थित होते.
अंनिसचे आवाहन
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती कायमच व्यसनांविरोधात आणि अंधश्रध्देविरोधात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतावेळी मद्यप्राशन करण्याची अनिष्ठ प्रथा सर्वत्र रुढ होत आहे. प्रामुख्याने शहरांमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री मद्याला अधिक पसंती दिली जात असल्याने याविरोधात जनजागृतीसाठी अंनिसकडून नाशिक शहरातही उपक्रम राबवण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी न करण्याचे आवाहनही करण्यात आले.