धुळे – शहरातून चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे चौफुलीवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे, अशी माहिती आमदार फारुक शाह यांनी दिली.
हेही वाचा – नाशिक: अवैध देशी दारु अड्ड्यावर छापा, ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
हेही वाचा – जळगाव : नशिराबादमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीखाली दबून मुलाचा मृत्यू
शहरातून मुंबई-आग्रा आणि धुळे-सोलापूर हे दोन महामार्ग जातात. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना चाळीसगाव चौफुलीवरून जावे लागते. चाळीसगाव चौफुलीवर बऱ्याचवेळा सिग्नल यंत्रणा बंद राहत असल्याने या ठिकाणी दिवसभर वाहतूक कोंडी होते. यातून दररोज अपघात होतात. या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल व्हावा, या मागणीसाठी आमदार फारूख शाह यांच्या नेतृत्वात चौफुलीवर आंदोलन करण्यात आले होते. प्रयत्नांना यश आले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाणपुलासाठी ७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शाह यांनी दिली.