लोकसत्ता वार्ताहर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
धुळे: शहराजवळील वरखेडी गावात जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जुगार्यांनी हल्ला केला. त्यात पाच पोलीस जखमी झाले असून २३ संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १९ संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शहरापासून जवळच असलेल्या वरखेडी गावात बहीरम महाराज यात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. गावातील एका घरामागे जुगार सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार विभागाचे पथक रविवारी रात्री कारवाईसाठी गेले. यावेळी जुगारींनी गुन्हे शाखेच्या पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात हवालदार योगेश ठाकूर, मयूर पाटील, तुषारी पारधी, जगदिश सूर्यवंशी, योगेश साळवे हे पाच पोलीस जखमी झाले. मारहाणीनंतर संशयीत पळून गेले. या हल्ल्या प्रकरणी हवालदार योगेश ठाकूर यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यावरून २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंंदे, हवालदार भास्कर बैसाणे, श्रीकांत पाटील, प्रवीण पाटील यांच्या पथकाने रात्रीतून धरपकड करुन १९ संशयिताना अटक केली. त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आ असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.