नाशिक : नांदगाव मतदार संघातील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार सुहास कांदे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या धाराशिवच्या कांदे सुहास (अण्णा) यांना कारंजा तर याच मतदारसंघात शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) उमेदवाराशी नामसाधर्म्य राखणाऱ्या गणेश काशिनाथ धात्रक यांना चिमणी चिन्ह मिळाले. राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी पदाधिकारी समीर भुजबळ यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले. नाशिक पूर्वमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या गणेश बबन गितेंना ऊस शेतकरी हे चिन्ह मिळाले. शरद पवार गटाचे ज्या पाच मतदारसंघात उमेदवार आहेत, तिथे एका जागेचा अपवाद वगळता अपक्ष उमेदवारांना पिपाणीसदृश ट्रम्पेट हे चिन्ह मिळाले असून अन्यत्रही त्यास अपक्षांनी पसंती दिली आहे.

माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली. आयोगाच्या निर्देशानुसार चिन्हांचे वाटप उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले. १५ मतदारसंघात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे ४६ उमेदवार असून नोंदणीकृत राजकीय पक्षांचे (मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य ) ५२ आणि अपक्ष ९७ असे एकूण १९६ उमेदवार रिंगणात आहेत. बंडखोरी आणि नामसाधर्म्य साधणाऱ्या उमेदवारांमुळे काही मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. अपक्षांनी आयोगाने उपलब्ध केलेल्या चिन्हांपैकी आवडत्या चिन्हांना पसंती दिली. त्यांना आपले चिन्ह मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी केवळ १३ दिवसांचा अवधी आहे.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा…मालेगाव बाह्य, बागलाण, इगतपुरीत दोन मतदान यंत्रांची गरज

चांदवडमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात शड्डू ठोकणारे त्यांचे बंधू केदा आहेर यांना ऑटोरिक्षा निशाणी मिळाली. या मतदारसंघात अन्य अपक्षांना सीसीटीव्ही कॅमेरा, शिट्टी, बॅट, जातं, सफरचंद, द्राक्षे अशी चिन्हे मिळाली. दमदाटी, धमक्या, आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या नांदगावमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशी नामसाधर्म्य साधणाऱ्या धाराशिवच्या कांदे सुहास (अण्णा) यांना कारंजा तर, या जागेवर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार गणेश धात्रक यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या गणेश काशिनाथ धात्रकांना चिमणी निशाणी मिळाली. अजित पवार गटाचे मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ हे शिट्टी चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघात ट्रम्पेट, चिमणी, गॅस सिलिंडर, ग्रामोफोन अशी अनेक चिन्हे मतपत्रिकेवर दिसणार आहेत.

इगतपुरीतील महाविकास आघाडीतील बंडखोर निर्मला गावित या बादली चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. मालेगाव मध्यमधील अपक्षांना हिरा, सफरचंद, एअर कंडिशनर, बॅट अशी चिन्हे मिळाली. नाशिक मध्य मतदारसंघात काडेपेटी, ट्रम्पेट, इस्त्री, अंगठी तर नाशिक पश्चिममध्ये ट्रक, रिक्षा, हिरा, फळा, रोडरोलर अशी चिन्हे अपक्ष उमेदवारांना मिळाली. देवळालीत रविकिरण घोलप यांना ट्रम्पेट चिन्ह मिळाले.

नाशिक पूर्वचा अपवाद

राष्ट्रवादी शरद पवार गट बागलाण, येवला, नाशिक पूर्व, दिंडोरी आणि सिन्नर या जागा लढवित आहे. बागलाणमध्ये बापू आनंदा पवार (सर) नामक उमेदवाराला ट्रम्पेट तर इतरांना ऊस शेतकरी, शिवणयंत्र, नागरिक, हॉकी बॉल आदी चिन्हे मिळाली आहेत. येवला मतदारसंघात अपक्ष नरसिंह दरेकर यांना ट्रम्पेट, इतरांना ग्रामोफोन, संगणक, किटली अशी चिन्हे मिळाली. सिन्नरमधून शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे यांच्या विरोधात सागर सांगळे या अपक्ष उमेदवाराल ट्रम्पेट हे चिन्ह मिळाले. नामसाधर्म्य साधणाऱ्या उमेदवाराला हे चिन्ह मिळण्याचा योगायोग नाशिक पूर्वमध्ये जुळला नाही. या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या उमेदवाराला ऊस शेतकरी हे चिन्ह मिळाले.

हेही वाचा…शहरासह ग्रामीण भागात प्रचाराच्या वेगळ्या तऱ्हा

दिंडोरीत पुन्हा तोच खेळ ?

दिंडोरी लोकसभा निवडणुकीवेळी नामसाधर्म्य आणि पिपाणीसदृश चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांचे मताधिक्य सुमारे एक लाख मतांनी घटले होते. विधानसभा निवडणुकीत तोच खेळ पुन्हा खेळला जात आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुनिता चारोस्कर यांचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह असताना त्यांच्या नावाशी काहीसे साधर्म्य साधणाऱ्या अपक्ष उमेदवार सुशिला चारोस्कर यांना पिपाणीसदृश असणारे ट्रॅम्पेट चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत काहिशा समान दिसणाऱ्या चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे प्रचारासाठी कुठेही न फिरलेल्या तिसरी उत्तीर्ण अपक्ष उमेदवार बाबू भगरेंना (सर)एक लाखहून अधिक मते मिळाली होती. या जागेवर आता अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ हे उमेदवार आहेत. अन्य अपक्ष उमेदवारांना बासरी, व्हील बॅरो, कढई, शिट्टी असे चिन्हे मिळाली आहेत.

Story img Loader