नाशिक – लक्ष्मी पूजनच्या रात्री आतषबाजीमुळे गंगापूर रोड आणि सभोवतालच्या भागात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक उंचावली. धुलीकणांमुळे कित्येकांना श्वसनास त्रास होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पाथर्डी परिसरातील गुरु गोविंद सिंग शाळा (पांडवनगरी) परिसरासह अंबड औद्योगिक वसाहतीत वेगळी स्थिती नव्हती. तुलनेत पंचवटीतील हिरावाडी भागात हवा कमी प्रदूषित आढळली. केवळ ध्वनि प्रदूषण नव्हे तर, वायू व धुलिकणाने हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थायी हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्राच्या नोंदीतून उघड झाले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ध्वनी व हवा प्रदूषणाचे मापन प्रगतीपथावर आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी ध्वनि व वायू प्रदुषणाची पातळी कमालीची उंचावते. ध्वनि प्रदूषणाबाबत अद्याप स्पष्टता झाली नसली तरी मंडळाच्या स्थायी हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्राच्या आकडेवारीतून वायू प्रदूषणाची पातळी समोर आली आहे. मंडळाची गंगापूर रोड, पाथर्डी भागातील गुरु गोविंद सिंग शाळेलगत (पांडवनगरी), हिरावाडी आणि अंबड औद्योगिक वसाहतीत केंद्रे आहेत. या भागात अव्याहतपणे हवेची गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात. सकाळी बहुतांश भागात चांगली वा समाधानकारक असणारी हवा सायंकाळी पूर्णत: बदलली. सायंकाळनंतर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली, हिवाळ्यामुळे वातावरणातील प्रदूषित वायू आणि धुलिकण हवेतच राहिल्याने गुणवत्ता खराब होते. त्यामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. दिवाळीत शहरातील काही भागात तशी स्थिती निर्माण झाल्याची आकडेवारी आहे.

dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

गंगापूर रोड भागात रविवारी सर्वाधिक २०२ हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नोंद झाली. तर पांडवनगरी केंद्रावर तो १८८ इतका होता. अंबड औद्योगिक वसाहतीतील केंद्रावर १५९ तर पंचवटीतील हिरावाडी भागात ९७ एक्युआयची नोंद झाली. प्रदूषणासंबंधी निर्देशाकांतून आरोग्याला धोका उत्पन्न होत असल्याचे लक्षात येते. कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची ओळख धुलीकणांसह अन्य वायुंमुळे अडचणीत येण्याच्या मार्गावर असल्याचे आधीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार सिडको, सातपूर गाव, मुंबई नाका, आणि कोणार्कनगर ही सुक्ष्म धुलीकणाची प्रमुख ठिकाणे आढळली होती. लोकसंख्येची घनता, मोठ्या प्रमाणातील बांधकामे, रस्त्यांची खोदकामे, वाहनांची घनता यामुळे धुलीकरणांचे उत्सर्जन होते. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया यामुळे नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन होत आहे. फटाक्यांनी यात आणखी भर घातल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी दुजोरा दिला. फटाक्यांमुळे विशिष्ट आकारातील धुलीकण हवेत मोठ्या प्रमाणात पसरले. सायंकाळी सात ते रात्री ११ या काळात हवेची गुणवत्ता खराब झाली. थंडीचे दिवस असल्याने हे धुलीकण वातावरणात वर जात नसल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>नाशिक शहरात पुन्हा जलसंकट; नाशिकरोड विभागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

आरोग्यावर परिणाम कसा ?

हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार शून्य ते ५० एक्युआय पातळीची हवा चांगली मानली जाते. त्याचा आरोग्यावर परिणाम अतिशय कमी असतो. ५१ ते १०० एक्युआय म्हणजे हवेची गुणवत्ता समाधानकारक म्हणता येईल. या स्थितीत केवळ आजारी व्यक्तींना श्वसनास किरकोळ त्रास होऊ शकतो. पंचवटीतील हिरावाडी वगळता कुठल्याही भागात १०० एक्यु्आयच्या खाली नोंद झाली नाही. गंगापूर रोड या निवासी भागात हवा गुणवत्ता निर्देशांकाने २०२ चा टप्पा गाठला. त्यामुळे प्रत्येकास श्वसनाचा त्रास जाणवण्याची शक्यता बळावली. १०१ ते २०० या निर्देशांकातील प्रदूषणात फुफ्फुस, दमा, हृदयविकार असलेल्यांना श्वसनास त्रास होतो.

फिरत्या केंद्रासाठी विजेचा शोध सुरुच

कुठल्याही भागातील हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी मंडळाच्या नाशिक विभागाकडे उपलब्ध झालेल्या फिरत्या वातावरणीय हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्राला (प्रयोगशाळेला) कार्यान्वित राखण्यासाठी किमान २४ तास वीज लागते. सार्वजनिक ठिकाणी तशी व्यवस्था होत नसल्याने ऐन दीपावलीत वेगवेगळ्या भागातील नोंदी संकलन करणे मंडळाला अवघड झाले आहे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी बरेच प्रयत्न करून एका ठिकाणी विजेची उपलब्धता झाली. पण, चार तासानंतर अकस्मात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हे काम अर्धवट राहिले. फिरत्या केंद्राच्या माध्यमातून नोंदी संकलन करणे जिकिरीचे ठरले आहे. मंगळवारी उंटवाडी भागात विजेची व्यवस्था झाल्याचे मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी सांगितले.